रात्रीच्या वेळी मोबाईल पाहाताना अनेकदा युजरना प्रचंड झोप येत असते. अशा झोपाळू युजरसाठी आता युट्युबने नवीन फिचर्स आणले आहे.
यूट्यूब एक व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. ज्याचा वापर अब्जावधी युजर करीत असतात. YouTube ऑनलाइन मनोरंजन करणारे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे. ज्याचा वापर जगभरातील जवळपास प्रत्येक देशात केला जातो. या युट्युबची लोकप्रियता कायम ठेवण्यासाठी कंपनी वेळोवेळी त्यात बदल करीत असते. तसेच नवनवीन फिचर्स युजरसाठी आणत असते. जे युजरना खूपच आवडतात.
आता कंपनीने एक नवीन फिचरची चाचणी सुरु केली आहे. या नवीन फिचरमुळे जर तुम्ही व्हिडीओ पाहाता पाहाता झोपला तर हा व्हिडीओ आपोआप बंद होणार आहे. म्हणजे या मध्ये काही सेन्सर लावणार असा काही विचार नाही. परंतू तुम्ही आधीच सेटिंग करुन यात तसे बदल करु शकणार आहे. या फिचरला स्लिप टायमर असे नाव देण्यात आले आहे. हे एक एक्सपेरिमेंटल फिचर आहे. वर्तमानात काही निवडक युजरसाठी ते उपलब्ध आहे. जर लोकांना हे फिचर आवडले तर सर्वच युजर साठी ते लागू केले जाणार आहे.
YouTube Sleep Timer Feature चा वापर कसा ?
नवीन स्लीप टायमर फिचरचा वापर करणे खूपच सोपे आहे. या फिचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये लॉग इन करावे लागणार आहे. त्यानंतर युजरला आपल्या मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटरवर युट्युब ऐप ओपन करावा लागणार आहे. आणि व्हिडीओ प्ले केल्यानंतर सेटिंग्समध्ये जावे लागेल, तेथे तुम्हाला स्लीप टायमरचे ऑप्शन सापडेल. तेथे आपण किती वेळाने हा व्हिडीओ बंद होईल याची निवड करु शकणार आहे. उदाहरणार्थ 10 मिनिटे, 15 मिनिटे, 20 मिनिटे, 30 मिनिटे आदी. युजर आपल्या इच्छेनूसार या पैकी कोणताही वेळ निवडू शकणार आहे. म्हणजे तुम्ही व्हिडीओ पाहाता…पाहाता झोपून गेला तर व्हिडीओ सुरु राहणार नाही. सेट केलेल्या वेळेनंतर तो आपोआप बंद होणार आहे. सध्या हा पर्याय केवळ प्रिमियर युजर्स साठी उपलब्ध आहे.
कसे आहे हे फिचर्स ?
हे फिचर त्या लोकांसाठी फायदेमंद होऊ शकते. जे झोपताना व्हिडीओ पाहणे पसंद करतात. या फिचरमुळे त्यांचा खूप फायदा होईल, युट्युब ठराविक मिनिटांनंतर बंद झाल्याने त्यांची बॅटरी आणि इंटरनेट डाटा वाचणार आहे. हे एक एक्सपेरिमेंटल फिचर आहे. या फिचरचा वापर करण्यापूर्वी याला मॅन्युअल रूपाने ते सुरु करावे लागेल, यासाठी प्रिमियम यूजर्सला यूट्यूबच्या होमपेजवर सेटिंग्समध्ये जावे लागणार आहे. ही सुविधा केवळ 2 सप्टेंबरपर्यंतच उपलब्ध आहे.