दूरसंचार क्रांतीचा पाया कोणी रचला?
“एकमेकांपासून दूर असलेला मनुष्य आपल्या आप्तस्वकीयांशी थेट संवाद साधू शकतो? हे साठच्या दशकात कपोलकल्पित अशीच गोष्ट. संवाद व सुचनांच्या आदानप्रदान करण्यासाठी त्याकाळात फोन, टपाल, तार अशीच माध्यम उपलब्ध होती. त्यांचा प्रसार पण तोकडा असाच होता.”
मात्र, सत्तरच्या दशकात या संदर्भात मोठ्या विकासाची पायाभरणी झाली. त्याचे कर्तेधर्ते होते अमेरिकन शास्त्रज्ञ मार्टिन कूपर. अमेरिकेतील शिकागो शहरात जन्मलेल्या मार्थीन कूपर यांनी इलेक्ट्रॉनिक विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतली. पुढं आपलं आयुष्य या क्षेत्रातील संशोधनाला स्वाधीन केलं.
याच मार्टिन उर्फ मार्टो यांना जगप्रसिद्ध मोटोरोला कंपनीत एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मग, त्यांनी दूरसंचार क्षेत्राशी निगडीत संशोधनावर भर दिला. यातूनच त्यांना यश आला अन् १९७३ रोजी जगातला पहिला मोबाईल फोनचा अविष्कार समोर आला.
सलग तीन महिने काम करत त्यांनी एक मोबाईल तयार केला. त्यावरील पहिला संवादही त्यांनीच केला. आपल्या संशोधन अन् अविष्काराच्या यशाने त्यांनी मोटोरोला कंपनीला जगातील पहिला मोबाईल तयार कंपनीचा मान मिळवून दिला.
ड्यॅनाटॅक असे मोबाइलचे नामकरण केले. पुढं मोटोरोलाने यात मूलभूत सुधारणा करत, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत १९८४ पर्यंत या नावाच्या सिरिजचे अनेक फोन बाजारात दाखल करत मार्टीन कुपर यांचा शोधास व्यवसायीक रूप दिलं.
कसा होता पहिला फोन
▪️हा फोन तब्बल १.१ किलोग्रॅम वजनाचा होता.
▪️तब्बल १० तास चार्जिंग करावे लागत असे.
▪️केवळ २५ मिनिटाचा संवाद शक्य असायचा.
▪️हा फोन ९ इंच उंची एवढ्या आकाराचा होता.
▪️तत्कालीन काळात दोन लाखांवर होती किंमत
ग्रॅहम बेलचा फोन ते मोबाईल
मार्टीन कूपर यांनी मोबाईल फोनचा शोध लावण्यापूर्वी विश्वात ‘वायर युज्ड फोन’चा वापर सुरू होता. अलेक्झांडर ग्रॅहम बेल या शास्त्रज्ञाने १८७६ साली या फोनचा शोध लावला होता. जगातील ती मोठी वैज्ञानिक उपलब्धी मानली जायची.
मोबाईल फोन, जग जवळ आले
मोबाईल फोनचा शोध लागल्यानंतर त्यात दिवसेंदिवस मोठ्या सुधारणा झाल्या. काळाच्या ओघात तो ‘स्मार्ट’ तर झाला, शिवाय यांने माणसाला एकमेकांशी जोडून ठेवले. माहितीच्या मायाजालात मनुष्यास गुंतवले. संवाद तर वाढलाच शिवाय अनेक फिचर, टुल्स, अॅप्लिकेशन यामुळे तो मनुष्य जीवांची एक जीवनावश्यक वस्तू बनला गेला.