रिमेल चक्रीवादळाचे सावट : इथं आहे धोका
मुंबई :-
देशभर यंदाचा उन्हाळा हा अभूतपूर्व ‘हीट वेव्ह’चा चटका देणारा ठरला आहे. तापमानाचा पारा चढलेला, यात आर्द्रतेत वाढ. यामुळे आलेला दिवस काढणे असह्य ठरत आहे. विशेषतः उत्तर भारत, रायलसीमा, मध्य भारत, विदर्भ व मराठवाडा या काहिलीत होरपळून गेला आहे.
यास्थितीत मान्सून समाधानकारक वाटचाल करत असल्याने पावसाच्या आल्हाददायक वातावरणाची उष्णतेच्या झळा सोसणार्या भारतीयांना पावसाच्या आल्हाददायक वातावरणाची आस लागली होती. असे असतानाच अचानक बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाने तोंड काढले आहे. हे तीव्र हवामानातील बदल अधीकच विकसीत होत चक्री वादळात परावर्तीत होत आहेत.
रिमेल : बंगालच्या उपसागरात दिली वर्दी
बंगालच्या उपसागरात ढंगाची गर्दी वाढली आहे. वार्याचा वेग कमालीचा वाढला आहे. सागरातील तापमान विसंगत झाले आहे. या सर्वांचा परिणाम होवून स्थानीक वातावरणाने चक्रीवादळाचे रूप घेतले आहे. याचा रोख बंगालच्या उपसागरातून पश्चिम बंगाल, ओडिसा, बांग्लादेश या भुप्रांताकडे दिसून येत आहे.
इशारा : इथे दाखवेल प्रभाव
- २५ मे रोजी बंगालचा उपसागर, बांग्लादेशात ताशी ८० ते १०० वार्याचा वेग राहिल.
- २६ मे रोजी याच भागात १०० ते १२० ताशी वेगाने वारे प्रवाही होईल
- २७ मे रोजी हे वादळ ‘लँडफॉल’ करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
- या दरम्यान पश्चिम बंगाल विशेषतः गंगातीराचा भाग, कोस्टल, छत्तीसगड भागात जोरदार मुसळधार पाऊस होईल.
- जमिनीपासून कमी उंचीवर तीव्र वादळ उदभवेल. हवामान शास्त्रानुसार यास ‘स्ट्रॉंग सरफेस वाईन्ड’ म्हटले जाते.