” मागच्या दशकभरात महाराष्ट्र राज्यात खरीप हंगामातील एकूण लागवडीखालील पिकांत सोयाबीन पेरणीचा दरवर्षी वृद्धिंगत होत गेल्याचे दिसून येते. यामुळेच राज्याचे खरीप हंगामातील सोयाबीन हे प्रमुख पीक म्हणून नवी ओळख निर्माण करत आहेत. अशा या पिकाची उत्पादकता पूर्णतः बियाण्यांचे वाण, पेरणी पद्धत, वापरलेले बियाणं, मशागत तसेच किडरोग प्रतिबंधक व्यवस्थापन यावर बेतलेली असते”
- सोयाबीन बियाण्याची जितकी उगवण क्षमता चांगली, तितकं उत्पादन अधिक येतं. बियाणं निर्धारित प्रमाणात नसेल, त्याची उगवण क्षमता कमी असेल तर उत्पादनात घट होते.
- सोयाबीन हे स्वपरागसिंचित असंत. यामुळे पेरलेल्या बियाण्यांचे गुणधर्म, वाण यात बदल होत नाही. यामुळे जे पेरलं ते उगवलं तर मूळ गुणधर्मात अंशतः बदल होतात.
- सोयाबीन हे सरळवाण आहे. यामुळे दरवर्षी बियाणं बदलण्याची गरज राहत नाही. किमान तीन वर्ष बियाणं बदलावे लागत नाही. यामुळे घरगुती बियाणे पेरण्याकडे कल असतो.
कशी तपासावी उगवण क्षमता
सोयाबीनचे घरगुती बियाणं पेरणी करण्यापूर्वी काही दिवस आधी बियाण्यांची उगवण क्षमता तपासुन घेणं गरजेचं राहतं. यासाठी सोयाबीनचे शंबर दाणे निवडायचे. यास काडी कचरा काढून स्वच्छ करायचे. यानंतर कुंडी किंवा गोणपाट घ्यायचं. गोणपाट असेल तर पाण्यात चांगल भिजवून घ्यायचं. यात उभ्या दहा व आडव्या दहा बियाण्यांची उजळणी पाढ्यातील आकड्याप्रमाणे मांडणी करून शंभर दाण्याचा पट व्यवस्थित तसेच समांतर अंतर राखत पट मांडायचा. यानंतर चार पाच दिवस त्यास ठेवायचे. आवश्यकतेनुसार पाणी शिंपडायचे किंवा स्प्रे करायचा.
किती दाण्यांना अंकूर : अशी ठरते उगवण क्षमता
तीन ते पाच दिवसांनी गोणपाटात ठेवलेले बियाणं पाहुन घ्यायचं. यात अंकुर फुटण्याची प्रक्रिया प्रगतीत असल्यानंतर उगवण क्षमता तपासणी करून घ्यायची. यात किती दाण्यास अंकूर फुटला, यावरून प्रमाणबद्ध बियाणं किती वापरायचे याच्या कोष्टकाचे अवलोकन करायचे. त्यानुसार प्रत्यक्ष पेरणी करताना बियाण्यांचा एकरी वापर करायचा. एकुण ७० टक्के बियाणं दाण्यास अंकूर फुटले तर ते सर्वोत्तम उगवण क्षमतेचं बियाणं समाजायचे. कमी राहिल्यास खालील कोष्टकानुसार बियाण्यांची मात्रा वाढवयाची.
कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार ७० टक्के उगवण क्षमता असेल तर हेक्टरी ६५ किलो बियाणं वापरण्याचे सुचित केले आहे. तर, शेतकरी मित्रांनो अधिक उत्पादनासाठी आपल्या घरगुती बियाण्यांची उगवण क्षमता आपण तपासुन घेतलेली बरं राहिल.
- ७० टक्के उगवण – ३० किलो बियाणं वापर
- ६८ टक्के उगवण – ३१ किलो बियाणं वापर
- ६६ टक्के उगवण – ३२ किलो बियाणं वापर
- ६४ टक्के उगवण – ३३ किलो बियाणं वापर
- ६२ टक्के उगवण – ३४ किलो बियाणं वापर