बेभान झालं वारं
ताशी कमाल वेगात ‘धाराशीव’ देशात चौथ्या स्थानावर
लोकसंवाद एक्सक्लुसिव्ह :
देशातील हवामानात मागच्या चार दिवसात तीव्र स्वरूपाचे बदल दिसून येत आहेत. राजस्थान तसेच लगतच्या काही भागात उष्णतेची लहर जनजीवन विस्कळीत करत असतानाच बंगालच्या उपसागरात ‘रिमेल’ चक्रीवादळाचा प्रकोप दृष्टीपथात येत आहे.
रिमेल चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये ‘लँडफॉल’ करेल असे अपेक्षीत आहे. याशिवाय पश्चिम बंगाल, ओडीसा राज्यात याचे पडसाद दिसून येतील तसेच या वादळाचा मध्यभारत , आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातील वातावरणात पण काही बदल दिसून येत आहेत.अनेक ठिकाणी ढगांची वर्दळ, आद्रता व वार्याच्या वेगात बदल दिसून येत आहेत.
तटवर्ती भागात नव्हे धाराशीवात 'बेभान वारं'
भारतीय हवामान विभागाने नुकताच एक रिपोर्ट जाहीर केला आहे. यात दिनांक २६ मे रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंतच्या हवामानाची विस्तृत माहिती दिली आहे. मागच्या २४ तासात नोंदल्या गेलेल्या हवामान घटकांचा यात ऊहापोह करण्यात आला आहे. यात देशात वार्याचा कमाल ताशी वेग असलेल्या ‘टॉप फाईव्ह’ ठिकाणावरील वार्याचा वेग नमूद करण्यात आला आहे.
- 1 – बालाघाट (मध्यप्रदेश) – 113 किमी/ताशी
- 2 – नलबारी (आसाम) – 105 किमी/ताशी
- 3 – धूबरी (आसाम) – 94 किमी/ताशी
- 4 – धाराशीव (महाराष्ट्र) – 79 किमी/ताशी
- 5 – विकाराबाद (तेलंगणा) – 68 किमी/ताशी
एकुणच ज्या भागात या दिवसात ताशी २५ ते ३५ किलोमीटर ताशी वार्याचा वेग असतो तिथे २६ मे रोजी मागच्या २४ तासांत वार्याचा कमाल ताशी वेग ७९ राहिला आहे. याचा अनेकांना फटका बसल्याचे दिसून येत आहे.