Remal Cyclone Update : चक्रीवादळाचं नाव कसं ठरवलं जातं? हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर याबाबत सविस्तर माहिती वाचा.
: Loksanvad News Network :
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं ‘रेमल’ चक्रीवादळ काही वेळातच किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. यामुळे पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरमध्ये ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. किनारपट्टी लगतच्या भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, काही भागातून नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहेत. याआधी दक्षिण भारतात मिचॉन्ग चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला होता. दरम्यान, चक्रीवादळाचं नावं कसं ठरवलं जातं? असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. तर त्याचं उत्तर घ्या मग जाणून.
चक्रीवादळाची नावं कशी ठरवली जातात?
पूर्वीच्या काळी चक्रीवादळाचं नामकरण करण्याची पद्धत नव्हती. सुरुवातील चक्रीवादळ तारखेनुसार ओळखले जायचे. पण, पुढे तारखांनुसार चक्रीवादळाची माहिती लक्षात ठेवणं कठीण होत गेलं. याशिवाय एकाच वेळी वेगवेगळ्या भागात चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याने हवामान शास्त्रज्ञाच्या समोर चक्रीवादळाला एखाद नाव द्यावं असा विचार पुढे आला.