राजकोट गेम झोन अग्नितांडव, 32 जणांचा होरपळून मृत्यू; पाहा अंगावर शहारे आणणारे PHOTO
Rajkot TRP Game Zone Fire: गुजरातच्या राजकोटमधल्या गेमझोनमध्ये अग्नितांडव. 12 मुलांसह 32 जणांचा होरपळून मृत्यू, डिझेलच्या साठ्यामुळे आगीचा भडका उडाल्याची माहिती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गेम झोनच्या घटनेसंदर्भात ट्विटरवर पोस्ट करून शोक व्यक्त केला.
या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारनं चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासोबतच जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी एसआयटीकडे सोपवण्यात आली आहे.