छत्रपती संभाजीनगरमधील दौऱ्यात पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला होता. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही, असे वक्तव्य परत एकदा केले.
Raj Thackeray On Maratha Reservation : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या अॅक्शन मोडवर आले आहेत. राज ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यादरम्यान एक मोठे वक्तव्य केले होते. महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही, असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते. आता त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील दौऱ्यात पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला होता. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही, असे वक्तव्य परत एकदा केले
राज ठाकरे हे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. यावेळी राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी राज ठाकरेंनी मराठा आरक्षणासह निवडणूक, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबद्दल भाष्य केले. “गेल्या अनेक दिवसापासून मराठवाड्यातील राजकारण आणि वातावरण पाहत होतो, ऐकत होतो. त्याची प्रचिती आली”, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले
“मराठवाड्यातील राजकारणाची प्रचिती आली”
“सोलापूरपासून दौऱ्याला सुरुवात केली. साडेतीन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आहेत. दिवाळीनंतर होतील असं चिन्ह आहे. असं आज तरी वाटतंय. त्यादृष्टीने माझा मराठवाड्यातील पहिला दौरा आज संभाजीनगरात पूर्ण होतोय. २० तारखेला माझा विदर्भ दौरा सुरू होतोय. मी दौरा आवरता घेतला अशा बातम्या तुमच्याकडे आल्या. कुठला आवरता घेतला माहीत नाही. पण माझा दौरा पूर्ण झाला. मधल्या काही गॅप होत्या. हिंगोलीला राहणार होतो. पण तिथून मी परभणीत आलो. सोलापूरपासून सुरुवात झाली. गेल्या अनेक दिवसापासून मराठवाड्यातील राजकारण आणि वातावरण पाहत होतो, ऐकत होतो. त्याची प्रचिती आली”, असे राज ठाकरे म्हणाले.
“आरक्षण द्यायचंच असेल तर आर्थिक निकषावर द्या”
“सोलापूरच्या पत्रकार परिषदेत मी बोललो ते सर्वांनी पाहिलं ऐकलं. पण त्यानंतर जाणीवपूर्वक बातम्या केल्या. त्या धक्कादायक होत्या. राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध, राज ठकारे विरुद्ध मराठा समाज… वाट्टेल त्या हेडलाईन केल्या. तुम्हाला आठवत असेल तर २००६ रोजी पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आमची एकच भूमिका राहिली आहे, ती म्हणजे आरक्षण द्यायचंच असेल तर आर्थिक निकषावर द्या”, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.
“त्या उपर राज्याला आरक्षणाची गरज नाही. कारण या राज्यात शिक्षणापासून, उद्योग आणि इतर गोष्टी उपलब्ध आहेत. नोकऱ्या आहेत. बाहेरच्या राज्यातील लोकांना या गोष्टी मिळतात. ते येऊन घेतात. त्याच गोष्टी आपल्या लोकांना दिल्या तर आरक्षणाची गरज उरणार नाही, असं म्हटलं होतं”, असेही राज ठाकरेंनी म्हटले.