राजस्थान आजच्या स्थितीत ‘रेकॉर्डब्रेक’ तापमानामुळे ‘तप्तस्थान’ ठरत आहे. जगातील सर्वाधिक तापमानाच्या ‘टॉप टेन’ शहरात राजस्थानमधील पाच शहरं आहेत. यावरून तेथील ‘हीट वेव्ह’ची कल्पना न केलेलीच बरी.
फलोदीचा पारा 50 अंशावर
राजस्थानातील फलोदी हे जिल्ही मुख्यालयाचे स्थान. शहरासह ग्रामीण भागात यंदा तापमानाचे ‘रेकॉर्डब्रेक’ झालं आहे. शनिवारी तर तापमानाचा पारा चक्क ५० अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. देशातील सर्वाधिक तापमान म्हणून याकडे पाहत असताना हवामानातील या नोंदी आपण गंभिर वळणावर पोहचलो आहेत हेच दर्शवत आहेत.
इतर शहरातही वेगळी स्थिती नाही
भारतातील वाळवंटी प्रदेश म्हणून परिचित असलेल्या राजस्थानात एरव्ही पण भारतातील इतर प्रांताच्या तुलनेत तापमान अधीक असते. यातही एप्रील, मे महिन्यात येथील पारा कमालीचा चढलेला असतो. यंदा मात्र पूर्वीच्या आकड्यांना मागे टाकत सामान्यपेक्षा तापमानात अधिकची वाढ झाली असल्याचे स्पष्ट होते. बाडनेर, जैसलमेर, चूरी येथेही तापमान ४८ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.