कुठे चकचकीत रस्ते तर कुठे खड्यात शोधावा लागतो रस्ता !
दिनांक 23 मे २०२४
पाचोरा जि. जळगाव
तेजस पाटील :- पाचोरा शहरातील रिंग रोडवर गो.से.हायस्कुल समोरील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे, रस्त्यावरील उघड्या पडलेल्या सळया कापून रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली गेल्याने नागरिकांनी जीव भांड्यात टाकला असला तरी रिंग रोड वरील खराब पॅच किमान काँक्रीटने लेव्हल करून ते भरले गेले असते तर नागरिकांनी आणखी समाधान व्यक्त केले असते.
रिंग रोड वरील नागरिकांकडून प्रशासनाला विनंती करण्यात येत असून गो. से. हायस्कुल ते मार्केट कमिटी मागील नवीन कॉम्प्लेक्स आणि डाक बंगला (सरकारी विश्राम गृह) हाऊस जवळ काही भाग बरेच स्ट्रीट लाईट बंद आहेत,यामुळे अगदी SDPO कार्यालय नजीक टवाळखोरी वाढली आहे.दारूपिणाऱ्यांचे,फुकणाऱ्यांचे हक्काचे कोपरे होऊ लागलेत,त्यात अंधारामुळे त्यांना फायदा होतो.
रस्त्यात कुठेच अंधार असणार नाही दोन चालू असलेले लाईट मधील अंतर फार आहे यासाठी बंद असलेले दूतर्फी स्ट्रीट लाईट्स बंद अवस्थेतील सुरू केले पाहिजे,जसे ठराविक रस्ते चकचकीत आणि लखलखीत केले गेलेत तसेच नसले तरी किमान प्रकाश पडेल इतके आणि मध्ये मध्ये सर्व बंद पडतात,आणि याच रस्त्यावर रात्री भरधाव ट्रॅक्टर व ढमपर चालतात म्हणून पुढे अपघात होण्याआधीच काळजी घेता येऊ शकते.
त्याच बरोबर छत्रपती संभाजीराजे चौक ते साई प्रॉव्हिजन हा रिंग रोड वरील रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात हातभर खोल खड्डे आहेत आणि गो से पर्यंत काही मोजके आहेत जे अंधारात दिसत नाही.सदर खड्डे योग्य काँक्रीट द्वारे कायमस्वरूपी भरण्यात आले पाहिजे.जेणेकरून लोकांना होणार शारीरिक त्रास कमी होईल.
काही ठराविक ठिकाणी झाडू साफसफाई तर इतर रस्त्यावर धुळीचा थर जमत चालला आहे,त्यात कॉलनी मध्ये साफसफाई झाडु मारणे हे सुद्धा नगरपालिका करत असते हे नागरिकांना ठाऊकच नाही,त्याचा कर नगरपालिका त्यांच्या कडून वसूल करते त्याची जाणीव त्यांना अजून नाही.
रस्त्यावर बेशिस्त नागरिकांकडून कचरा,अंधारात दारुड्यांकडून दारूच्या बाटल्या रस्त्यावर फेकले जातात सर्वत्र काच पडलेले असतात जिथे झाडू मारला जात नाही,तर अशे ठिकाण शोधून तिथे कचरापेटी ठेवली गेली पाहिजे.
ही भावना सर्व सामान्य नागरिक म्हणजे करदाते नागरिक व्यक्त करत आहेत.
ज्यांना सत्ता आणि प्रशासन उत्तरदायी असावे असे संकेत कागदोपत्री उरले आहे.