प्रतिनिधी :- मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील दिनांक 20 जुलै पासुन अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले असून आज तिसऱ्या दिवशी त्यांच्या समर्थनार्थ धाराशिव येथे मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत धाराशिव शहारालगत असलेल्या हातलाई तलावात जलसमाधी आंदोलन केले या आंदोलनाची प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली नसल्याचा आरोप करत कळंब तालुक्यातील मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याच पहायला मिळाले.
सायंकाळी 6.30 च्या सुमारास जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणा देत अचानक शेकडो मराठा आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमा होऊन जवळपास एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मनोज जरांगे यांच्या उपोषणाची तात्काळ दखल न घेतल्यास याहीपेक्षा अधिक तीव्रतेने आंदोलन करण्याचा ईशारा मराठा आंदोलकांनी दिला.जवळपास एक तासानंतर पोलीस प्रशासनास मागण्याचे निवेदन देऊन चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले.