प्रतिनिधी :- मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागील अनेक दिवसांपासुन चर्चेत असणारी 8 जुन रोजी बीड च्या नारायणगड येथे होणारी सभा रद्द करण्यात आली आहे तर या सभेच्या अनुषंगाने 4 जुन ही उपोषनाची तारीख जाहीर केली होती परंतु सभा पुढे ढकलल्याने आता 4 जुनच्या आधीच आमरण उपोषण सुरु करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
बिडच्या केज तालुक्यातील नांदूरघाट येथे झालेल्या दगडफेकीत मराठा समाज बांधव किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांची भेट जरांगे पाटील यांनी बिडच्या जिल्हा रुग्णालयात घेतली, यावेळी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले बीड मधे जो काही प्रकार सुरु आहे तो आता निवडणुकीनंतर होणे मला अपेक्षितच होते. मराठ्यांच्या मताची यांना गरज आहे, परंतु मराठा बांधवांची नाही, त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्यांनी ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे.
बीड मधील सभा रद्द
मनोज जरांगे पाटील यांची 8 जुन रोजी बीड मधे तब्बल 900 एक्करवर होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. बीड मधे सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अशातच सभेसाठी जमलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणुन ही सभा रद्द करण्यात आली असल्याच जरांगे यांनी कळवले आहे.