माढा:- लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. अशातच अर्ज भरण्याचा अंतिम दिवसही जवळ येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणारे उमेदवार वेगवेगळ्या क्लुप्त्या करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. माढा लोकसभेसाठी एका उमेदवाराने चक्क रेड्यावर बसून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे पाहायला मिळाले. यामुळे माढ्यातल्या एका उमेदवाराने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. मराठा आंदोलक राम गायकवाड यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना रेड्यावरच बसून एन्ट्री घेतली. माढा लोकसभेसाठी मराठा समाजाचे आंदोलक राम गायकवाड हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यावेळी राम गायकवाड यांनी यमराजाच्या वेशभूषा केली होती आणि ते रेड्यावर बसून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत . लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले राम गायकवाड पहा काय म्हणाले..