सर्वच मोठ्या कंपन्या करताय मनुष्यबळ कपात,आता तर ही दिगग्ज कंपनी सुद्धा !
Layoffs #Google #Amazon #Infosys #ItCrisis #Recession
दिनांक १८ एप्रिल २०२४
तेजस पाटील :-
आजच्या घडीला उद्योग जगतातील सर्वात मोठी बातमी हाती आली आहे,गुगल (Google) ही सर्वसृत कंपनी आणि याचे मूळ उद्योग समूहाचे नाव (albhabet) अल्फाबेट यांनी मनुष्यबळ कपातीचे संकेत दिले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल द्वारे त्यांनी आधीच हा मोठा निर्णय घेत असल्याचे कळवले होते. आर्थिक अस्थैर्य आणि कोस्ट कटिंग (Cost Cutting -व्यवसाय करतांना लागणार खर्च कमीत कमी करणे) हे दोन मुख्य कारणे समजून येतात. त्याच बरोबर उद्योग वाढीसाठी लागत वाढवण्यासाठी ही गोष्ट करावी लागत असल्याचे सुद्धा समजते. बिजनेस इंसायडर रिपोर्टच्या हवाल्याने ही माहिती सोमोर आली आहे.
एकूण किती कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार ? हा आकडा शेकडो असू शकतो आणि किती लोकांना पुन्हा दुसऱ्या ठिकाणी किव्हा दुसऱ्या कामात समायोजन करणार ?
हे स्पष्ट सांगितले जात नसले तरी पुनर्गठन प्रक्रिया होईल हे स्पष्ट संकेत दिले गेले आहे.
या आधी गुगलने मनुष्यबळ कपात कधी केली ?
गेल्या जानेवारी २०२३ मधेच जागतिक अल्फाबेट उद्योग समूह कर्मचारी संख्येच्या तब्बल ६% अर्थात १२,००० कर्मचारी नोकरीवरून काढणार असे सांगितले गेले होते.
या महिन्यात कोण कोणत्या उद्योगांनी कर्मचारी कपात केली ?
महिन्याभरात या आधी एमेझॉन आणि ॲपलने ६०० कर्मचारी कमी केले,तर ॲमेझॉन ने सुद्धा याच महिन्यात किती तरी शेकडो लोक घरी पाठवले. त्यात सेल्स,प्राईम व्हिडिओ सर्व्हिस,मार्केटिंग विविध विभागातून शेकडोने संख्या आहे.
टेस्ला :- इलोन मस्क संचलित ई वाहन निर्मिती उद्योग समूह असलेला टेस्ला यांनी सुद्धा १०% पेक्षा जास्त जगभरातून नोकरकपात केली आहे.वाढत जाणारे स्पर्धा आणि किमतीची कसरत यातून हा निर्णय घेत असल्याचे इलोन म्हणाले.यातच फक्त जर्मनी येथील टेस्लाने तब्बल ३००० ते १२००० कर्मचारी कमी केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
तोषिबा (Toshiba) ह्या प्रसिद्ध जपानी कंपनीने 5,000 लोकांना घरचा रस्ता दाखवला आहे तर दुसरीकडे citibank ने सुद्धा ७,००० लोक कमी केले पण त्यानंतर प्रचंड नुकसानीला सामोरे जात आहे.
भारतात बेरोजगारीचा आकडा किती ?
भारतातल्या एकूण बेरोजगारांपैकी सुमारे 83% हे तरूण बरोजगार आहेत आणि त्यांच्यातही सुशिक्षित बेरोजगार – माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे.
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन – ILO आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन डेव्हलपमेंटने प्रसिद्ध केलेल्या भारतातल्या रोजगाराच्या परिस्थितीविषयीच्या या अहवालात भारतातील रोजगार आणि बेरोजगारीसंदर्भातली महत्त्वाची निरीक्षण नोंदवण्यात आलेली आहेत.
हे सर्व आकडे प्रचंड निराशाजनक असले तरी आपली वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे याचा मागोवा घेण्याची तातडीची गरज लक्षात आणून देते.