Loksanvad News Network
आकाश वाघमारे
आज 13 ऑगस्ट. जागतीक लेफ्ट हँडर्स डे म्हणून जगभर साजरा केला जातो. डाव्या हाताच्या व्यक्तींचे वेगळेपण आणि फरक समोर आणण्याचा हा प्रयत्न. डावखुरी व्यक्तिमत्व अवलिया असतात, इतरांपेक्षा कशी वेगळी असतात हे जाणून घेणं सर्वांसाठीच उत्सुकतेचं असतं. यातुनच डावखुर्यांचे विश्व उलगडून दाखवण्याचा प्रयत्न.
प्रथमतः 1976 मध्ये लेफ्ट-हँडर्स क्लबचे संस्थापक डीन आर. कॅम्पबेल यांनी हा लेफ्ट-हँडर्स डे साजरा केला. या दिवसाची स्थापना प्रामुख्याने उजव्या हाताच्या जगात डाव्या हाताच्या व्यक्तींना येणाऱ्या अनुभवांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी करण्यात आली.
जागतिक स्तरावर डावखुऱ्या लोकांची संख्याही भारी मोठी. जगभरात हाताने डाव्या असलेल्या व्यक्तींबद्दल समज गैरसमज असतात. शास्त्रीय दृष्टीकोन बळवण्यासाठी व अश्या लोकांबद्दल असलेल्या अंधश्रद्धा विषयक बाबींचा बिमोड करण्यासाठी डीन आर. कॅम्पबेल यांनी डावखुऱ्या लोकांचा एक क्लब 13 ऑगस्ट 1976 रोजी निर्माण केला व आजच्या दिवशी जगाला डाव खुऱ्या लोकांबद्दल दखल घ्यायला भाग पडले.
जागतीक लोक संख्येच्या 8-10 टक्के लोक डावखूरे आहेत
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या म्हणण्यापेक्षा दर 100 व्यक्तीमागे 8-10 लोक डाव्या हाताचे आहेत. अश्या लोकांच्या मानवी जीवशास्त्रात ‘ हँडेडनेस’ हा एखाद्या व्यक्तीचा एक हाताचा प्राधान्याने वापर आहे. ज्याला प्रबळ हात म्हणून ओळखले जाते. कारण तो मजबूत, वेगवान किंवा अधिक निपुण असतात . दुसरा हात, तुलनेने बहुतेक वेळा कमकुवत, कमी निपुण किंवा कमी व्यक्तिनिष्ठपणे प्राधान्य दिलेला ‘नॉन-प्रबळ’ हात असतो .
डावखुऱ्या व्यक्ती : जन्मजात का?
यासंदर्भात झालेल्या अभ्यासाचे निष्कर्ष असे सूचित करतात की 40 पर्यंत ‘जीन्स’ हाताने काम करू शकतात. प्रत्येक जनुकाचा स्वतःचा कमकुवत प्रभाव असतो. उजव्या हाताच्या पालकांच्या मुलांपेक्षा डाव्या हाताच्या पालकांची मुले डाव्या हाताची असण्याची शक्यता जास्त असते. साल 2019 मध्ये, शास्त्रज्ञांनी डाव्या आणि उजव्या हाताच्या लोकांच्या ‘DNA’ मधील फरक देखील ओळखला आणि असे आढळले की भाषेवर प्रक्रिया करणारे मेंदूचे भाग डाव्या हाताच्या लोकांमध्ये एकत्र चांगले काम करतात.
कोणत्या देशात आढळतात सर्वाधिक डावखुरे व्यक्ती
जगाच्या पाठीवर 90 टक्के लोक उजव्या हाताचे द्योतक असले तरी 10 टक्के जग हे डाव्या हाताच्या लोकांचे आहे असे वैज्ञानिक अभ्यासातून पुढे आले असले तरी, या अभ्यासाला काही देश अपवाद आहेत. याठिकाणी डावखुऱ्यांची संख्या जागतीक प्रमाणापेक्षा जास्त आहे. ती खालील प्रमाणे-
नेदरलँड: 13.23%
युनायटेड स्टेट्स: 13.1%
कॅनडा: 12.8%
जागतिक ख्याती असलेल्या डाव खुऱ्या व्यक्ती
महात्मा गांधी
बिल गेट्स
रतन टाटा
सचिन तेंडुलकर
बरका ओबामा
ब्राईन लारा
नरेंद्र मोदी
अमिताभ बच्चन
रजनीकांत