Hardik Pandya And Natasha Stankovic : हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. हार्दिक पांड्या याने त्याची पत्नी नताशा हिच्यासोबत घटस्फोट घेतलाय. दोघांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपण घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. हार्दिकसोबत घटस्फोट घेण्याच्या अगोदर नताशा ही सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना देखील दिसली.
टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची एक्स पत्नी नताशा स्टॅनकोविच यांचा गेल्या महिन्यात घटस्फोट झाला. टी-T20 वर्ल्डकप आधीपासूनच दोघांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होती. पंड्याच्या इतर सामन्यांसाठी नताशा हजेरी लावत होती. मात्र वर्ल्ड कपमध्ये ती आली नसल्याने दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं आहे यावर शिक्कामोर्तब झालं होतं. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी जुलै 2024 मध्ये एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आपण सहमतीने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. इतकंच नाहीतर हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नताशा ही थेट तिच्या माहेरी सर्बियाला पोहोचली आहे.
नताशा ही हार्दिक पांड्या याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर आपल्या मुलासोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे. सतत ही आपल्या मुलासोबत फिरायला जाताना दिसत असून खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. नुकताच नताशा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. तिच्या या पोस्टनंतर लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. तिच्या या पोस्टमधून दिसत आहे की, नताशा ही परत एकदा प्रेमात पडलीये.
नताशा स्टॅनकोविच हिने नुकताच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक सेल्फी शेअर केलाय. या फोटोमध्ये नताशा ही कारमध्ये बसलेली दिसत असून ती बाहेर आकाशाकडे पाहताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत नताशा हिने कॅप्शनमध्ये लिहिले की, देवाने मार्गदर्शन केलेले, प्रेमाने वेढले… कृतज्ञतेने जगणे. मला आनंद वाटत आहे. आता हीच पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.
नताशा हिने थेट आपल्या पोस्टमध्ये ‘फॉल इन लव्ह’मध्ये आहे. हार्दिक पांड्या याच्यासोबतच्या घटस्फोटाला अवघे काही महिने झाले नाहीत तोवरच नताशा ही दुसऱ्यांदा प्रेमात पडल्याचे दिसत आहे. मात्र, हार्दिक पांड्यानंतर नताशाच्या आयुष्यात कोण आले, याबद्दल काही खुलासा होऊ शकला नाहीये. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते.
हेच नाही तर हार्दिक पांड्या याच्यावर नताशा प्रचंड नाराज होती. अनंत अंबानीच्या लग्नात अनन्या पांडे हिच्यासोबत धमाका करताना हार्दिक पांड्या हा दिसला होता. त्यानंतर हार्दिक पांड्या हा नताशा हिला डेट करत असल्याची एक चर्चा चांगलीच रंगताना दिसली. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी काही वर्षे डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला.