जागतिक कच्चे तेलाचे दर सध्या काय ?
काय खर, काय खोटं जाणून घ्या !
तेजस पाटील:-
सर्वसामान्यांना लागणाऱ्या प्रत्येक वस्तूच्या किमतीवर ज्या गोष्टीचा सर्वाधिक परिणाम होतो ते म्हणजे पेट्रोल व डिझेलचे दर.
सहाजिकच लोकसंख्या वाढताना वाहन संख्या सुद्धा वाढत चालली त्यात त्यांना लागणाऱ्या इंधनांपैकी पारंपरिक इंधन म्हणजे पेट्रोल व डिझेल अश्यात. रोजच्या वापरावर निर्बंध आणणे बोलायला सोपे असले तरी सार्वजनिक वाहतूकीचे अपुरी वाहनसंख्या मग ती सिटी बस असो किव्हा रेल्वे आणि दोन वाहनांच्या वेळापत्रक मधील गॅप यामुळे अप डाऊन करणार्यांना नोकरदारांना सोपा पर्याय स्वतःची वाहने ठरत असतात. पण त्यात ही सोपे नसते ते ट्रॅफिक कारण असाच विचार प्रत्येक रस्त्यावर वाहन चालवणारा सहाजिकच करत असतो.
हे सर्व महाकथा सांगण्या मागे कारण इतकेच की त्याच पेट्रोलचे भाव आपल्या देशापेक्षा शेजारील देशात स्वस्त भेटत असेल अशी गोष्ट कानावर पडली तर प्रत्येक व्यक्ती थक्क होईल.
मेन्स्ट्रीम मीडिया मध्ये नेहमीच दिवाळखोरी व महागाई दाखवतांना शेजारील देश दाखवले जातात त्यामुळे या गोष्टीवर विश्वास ठेवेल कोण ?
तर आजच्या बाजारमूल्य नुसार पाकिस्तान मध्ये पेट्रोल लिटर मागे २८२.२४ PKR (स्थानिक चलन) एवढे आहे आणि त्याचे भारताच्या भाषेत सांगायचे तर ८४.७४ रु.
तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे पाकिस्तान मध्ये तर किती महाग असतं पेट्रोल आम्ही नेहमी बातम्या बघतो तर गम्मत ही की आजच्या भारतीय रुपया चे डॉलर मधील भाव आणि पाकिस्तानी चलनाचे दर यात फार मोठा फरक आहे आणि आपल्याला सांगताना नेहमी त्यांच्या डॉलरच्या किमतीला अपल्यासोयीने दाखवून महाग दाखवले जात असते.
बर तुम्ही सहाजिकच विचाराल, भारतात आताचे पेट्रोल दर आणि २०१४ पूर्वी पेट्रोल दर याबाबद्दल काय ?
जगात crude ऑइलचे भाव महाग असतांना भारतात पेट्रोल स्वस्त होते,
आणि आता भाव कमी असतांना पेट्रोल महाग आहे.
दिनांक ४ एप्रिल २०१४ रोजी पेट्रोल प्रति बॅरल जागतिक मूल्य १०१.१४ $ डॉलर होते आणि आपण पेट्रोल प्रति लिटर सरासरी ७२ रु प्रमाणे घेत होतो,
तर २९ मार्च २०२४ रोजी पेट्रोल प्रति बॅरल ८३.१२ $ डॉलर इतके कमी झाले पण आपण प्रति लिटर सरासरी १०७ रु किमतीने घेत होतो.
म्हणजे पेट्रोल सध्या पूर्वीच्या जागतिक दरा पेक्षा स्वस्त आहे पण पेट्रोलियम कंपनी नफा कमवत असतांना दुसरीकडे टॅक्स वाढवून सर्वसामान्यांच्या खिशातुन लूट सुरू आहे का ?
हा प्रश्न लोकांना सतावत आहे.
एक बॅरल म्हणजे किती ?
एक बॅरल म्हणजे १५८.९ लिटर सरासरी १५९ लिटर इतके गृहीत धरले जात असते. यात गॅलन मध्ये मोजायचे झाले तर ४२ US Gallons इतके होतात.
सोबत दिलेले संदर्भ
१) Historical crude oil price chart. 2014 ते 2024.
२)महाराष्ट्रात लादलेले Vat केंद्र + राज्य दोन्ही tax घेतात + अधिकचे टॅक्स (Additional)