प्रशासकाच्या भरवसे कागदावर अंधविश्वासातून सह्या करणे पडले महागात.जिल्हाभरात फिरणाऱ्या पत्राने झाली संस्थाचालकाची #फुकट बदनामी.
प्रतिनिधी जळगाव
दिनांक २५/०६/२०२४
एका आटपाट राज्यात राजा चांगला असतो पण ८४ वर्षाच्या राजाच्या देखत मंत्रिमंडळातला वजीर वाटेल ते,वाटेल तसे काम करून घेतात.
स्वतःच्या मनाला वाटेल तिथे व्यक्तिगत वैमनस्यातून सरदारांच्या उचलबांगडी,सैनिकांची थेट सेनापती पदी पदोन्नती,सेनापती सोमोर स्वतःचे सैनिक उभे करून युद्धात अडचणीत आणणे, तर याहून पुढे जाऊन या डब्बाखोर वजीराने दुसऱ्या राजाच्या हातून स्वतःच्या सैन्यात परस्पर मलिदा लाटत कागदीघोडे फिरवून भरती,कुणाच्या खांद्यावर कुणाचे सह्याजीराव हा ही अजब प्रकार वजीर स्वतः करत असे पण राजा मात्र यात फुकटच स्वतःच्या राज्यात बदनाम झाला. कधी नव्हे ते राजाच्या चरित्रावर डाग लावून वजीर सेफ राहिला. स्वतःचे नातेवाईक,आप्तइष्ट यांना सरदार म्हणून भरतीत घेणे इतर उपेक्षित असतांना स्वतःचे पुतणे आता थेट सरळ सेवेतून सेनापती करण्याचे प्रयत्न होतांना दिसत आहे ते थांबतील का ?
बाकी दिलेल्या पत्रातून आपणास काय ते थोडक्यात कळेलच.
आता विठ्ठल भागवत संप्रदायातील वारकरी थेट जवळ करतात की हे बडवे पुन्हा सावळ्या विठ्ठलाला अजून काळे डाग लावत राहतात हे ही बघण्यासारखे असेल.