धक्कादायक रिपोर्ट मधील हे आकडे आले सोमोर !
तेजस पाटील :- मोतीलाल ओसवाल या नामांकित गुंतवणूक सल्लागार फर्म द्वारा एक रिपोर्ट जाहीर झाला आणि तो द हिंदू वृत्तपत्राने छापला आहे. त्यांच्या माहिती नुसार देशाच्या GDP सकल देशांतर्गत उत्पादनच्या अवघे ४०% भाग हा घरगुती कर्जाने तर फक्त ५% घरगुती बचतीने व्यापलेला आहे. हे आकडे नवीन उच्चांकी आणि नीचांकी गाठणारे आणि अर्थातच अर्थव्यवस्था फार सुरळीत नाही हे स्पष्ट दर्शवणारे आहेत.आर्थिक वर्ष २०२४च्या तिसऱ्या तिमाहीच्या त्यांच्या रिपोर्ट मध्ये हे संपूर्ण देशासोमोर आले आहे.Central Statistics Office (CSO) केंद्रीय सांख्यिकी कार्यालय द्वारे घरगुती निव्वळ बचत आर्थिक वर्ष-२३ मध्ये मागील ४७ वर्षातील निच्चांकी गाठणारा GDP च्या ५.३% होता तर,आर्थिक वर्ष-२२ मध्ये ७.३% राहिला. तर आर्थिक वर्ष१२-२० या दरम्यान सरासरी दर ७.६% होता.
दर दुसरीकडे घरगुती निव्वळ कर्ज दर आर्थिक वर्ष२१ मध्ये देशाच्या GDPच्या एकूण ३९.१%,आर्थिक वर्ष२२ मध्ये ३६.७%,आर्थिक वर्ष२३ मध्ये ३८%,डिसेंम्बर २०२३ अंती आर्थिक वर्ष२४ मध्ये हाच दर स्वातंत्र्यानंतर सर्वात उच्चांकी म्हणजे चक्क ४०% पर्यंत जाऊन पोहोचला आहे. या मागे मुख्य कारण म्हणजे लोकांच्या हातात चलन कमी असल्याने आणि कमाई कमी झाल्याने हा परिणाम दिसून येत असतो.
सरकार कडून नेहमी सारखे आकडे निराशादायक नसून लोकांना आपल्या भविष्यातील गुंतवणूक आणि रोजगारावर विश्वास असल्याने कर्ज वाढत चालली असे अजब दावा करण्यात आला तर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ही भारताच्या अर्थव्यवस्था कोलमडणारी काळजी वाढवणारी धोक्याची घंटा आहे अशी टीका केली आहे.