Loksanvad Vrutta Dharashiv :- धाराशिवचे विद्यमान पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची सोलापूर (ग्रामीण) येथे पोलिस अधिक्षक म्हणून बदली झाली आहे तर धाराशिवच्या नूतन पोलीस अधीक्षक पदाची धुरा संजय जाधव यांच्या हाती आली आहे. जाधव हे या आधी बारामती येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते.
राज्याच्या गृह विभागाने भारतीय पोलीस सेवा व राज्य पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदली व पदस्थापना संदर्भात आज आदेश निर्गमित केले आहेत. यात धाराशिवचे विद्यमान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणुन पदस्थापना झाली आहे तर कुलकर्णी यांच्या जागेवर बारामती येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी असलेल्या संजय जाधव यांची वर्णी लागली आहे.