प्रतिनिधी:- अभिनेता चिन्मय मांडलेकर हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका गोष्टीमुळे सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. चिन्मयने त्याच्या मुलाच नाव जहांगीर असं ठेवलं आहे. त्यावरुन चिन्मय बराच ट्रोल झालाय. नुकतच त्याची पत्नी नेहा जोशी मांडलेकर यांनी एक व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्सना चोख उत्तर देखील दिलं होतं. इतकच नव्हे तर चिन्मयला काहींनी पाकिस्तान किंवा आफगणिस्तानमध्ये जाण्याचा देखील सल्ला दिला होता. त्यावरुन देखील नेहाने चांगलेच खडेबोल सुनावले होते.
पण नेहाच्या या व्हिडिओनंतर चिन्मयने देखील त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. चिन्मयने हा व्हिडिओ शेअर करत एक मोठा निर्णय देखील घेतला आहे. दरम्यान चिन्मयने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने तो चांगलाच ट्रोल झाला. दरम्यान आता यापुढे शिवाजी महाराजांची भूमिका करणार नसल्याचा निर्णय देखील यावेळी त्याने घेतला आहे.
चिन्मयने व्हिडिओमध्ये काय म्हटलं?
हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्या कमी झाल्या का तर नाही. उलट आता त्या जास्त वाढल्या आहेत. आता तर लोकं त्याच्या पितृत्वापासून ते आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर कमेंट्स करतायत. एक व्यक्ती म्हणून त्याचा मला त्रास होतोय. मी अभिनेता आहे; पण म्हणून माझ्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला सोशल मीडियावरून कुठल्याही पद्धतीचा जर मानसिक त्रास होत असेल, तर त्याच्यासाठी मी बांधील नाहीये. माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता. तुम्हाला ते आवडलं, नाही आवडलं ते तुम्ही प्रत्यक्षात भेटून किंवा सोशल मीडियावरही सांगू शकता. पण, माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे, असं मला वाटत नाही. मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याच्याबद्दल आजपर्यंत अनेक माध्यमांवरून मी यापूर्वी बोललो आहे. जर कोणाला हे जाणून घेण्याची इच्छा असेल, तर त्यांनी ते व्हिडीओज जाऊन पाहावेत. काल नेहानंसुद्धा जेव्हा व्हिडीओ बनवला तेव्हा त्याची कारणमीमांसा केली म्हणून ती करण्याकरिता मी आता वेळ वाया घालवणार नाही.”