पूर्ण बातमी काय ? नक्की वाचा !
दिनांक २३/१०/२०२४
प्रतिनिधी जळगाव
पाचोरा येथील रहिवासी अभियंता तेजस पाटील यांनी अनेक वर्षांपासून पाचोरा शहरात स्वतंत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सरकारी औद्योगिक वसाहत असली पाहिजे यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता.सदर यासाठी मुख्यमंत्री पोर्टल मार्फत आपले गार्हाणे उद्योग मंत्रालय यांच्या पर्यंत सतत वेगवेगळ्या माध्यमातून ते मांडत होते. आधी २०१८ त्यांच्या पत्राला उत्तर देतांना पाचोरा तालुक्यासाठी कुठल्याही प्रकारची MIDC मंजूर नाही असे शासनाद्वारे कळवण्यात आहे होते मात्र निंभोरा शिवार तालुका भडगाव येथे मंजूर झालेली होती.
त्यांनी पुन्हा सरकार कडे पाचोरा शहरात रेल्वे रुळाला लागून असलेल्या गिरड रोड, किव्हा गाळण/तारखेडा रोड या भागात शहरालगत MIDC असली पाहिजे ही मागणी रेटून धरली.
त्यालाच सकारात्मक प्रतिसाद म्हणजे आज रोजी मा.तहसीलदार महोदय यांनी ईमेल द्वारे तेजस पाटील यांना पत्र दिले आणि त्यात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की उद्योग मांत्रालयाला दिलेल्या मागणी पत्रानुसार MIDC साठी जागा उपलब्धता तपासण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तर्फे कार्यालयातील प्रमुख भूमापक व क्षेत्र व्यवस्थापक सदर जागेची पाहणी करिता येत आहे व त्यासाठी जागेची माहिती असणारे गाव नकाशा,सात बारा उताऱ्यासह जागा दाखविणे करिता तलाठी जपलब्ध करून देण्यात यावे.
एकूणच पाचोरा शहर व तालुक्याच्या विकासासाठी ही एक फार सकारात्मक बाब असून भविष्यातील रोजगार निर्मिती आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी ही फार मोठी उपलब्धता ठरेल.