मंत्रालयात फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, पासाविना घुसलेल्या महिलेचा हंगामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेने तोडफोड केली. मंत्रालयाचा पास न काढताच तिने सचिन गेटने मंत्रालयात एन्ट्री केली होती.
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका अज्ञात महिलेकडून तोडफोड करण्यात आली आहे. मंत्रालयातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयातील भागातील भागाची मोडतोड करत घोषणाबाजी केली. तिने मंत्रालयाचा पास न काढता गेटमधून आत एन्ट्री केली. पोलीस आयुक्तांनी याबाबत गंभीर दखल घेत महिलेचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मंत्रालयातील सुरक्षेची ही मोठी चूक असल्याची चर्चा होत आहे. मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटमधून महिला आत मंत्रालयात आली. त्यानंतर तिने देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केली.