ajit pawar in solapur : आज सोलापूरमधील मोहोळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा मराठा बांधवांकडून अडवण्यात आला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मराठा बांधवांनी अजित पवारांकडे केली.
सोलापूर : मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 17 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. अशातच आज सोलापूरमधील मोहोळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा मराठा बांधवांकडून अडवण्यात आला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मराठा बांधवांनी अजित पवारांकडे केली.
जनसन्मान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी दुपारी मोहोळ येथे आले होते. मोहोळ शहरातून उपमुख्यमंत्री अजित पवार माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थाना कडे जाताना मराठा बांधवानी जोरदार घोषणाबाजी करत लक्ष वेधून घेतले.मोहोळ शहरात आगमन होण्याअगोदर याच मराठा बांधवानी चंद्रमौळी येथे अर्धनग्न होत. निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता.पोलिसांनी धावत्या ताफ्यासमोर कुणालाही जाऊ दिले नव्हते.आक्रमक झालेल्या मराठा बांधवानी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा परत जाताना कॅनवा अडविला आणि निवेदन दिले. तर अजित पवारांनी माढा येथील सभा झाल्यानंतर मुंबईकडे जाणार आणि मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा बांधवांना दिला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा येण्याअगोदर जोरदार पावसाची सुरुवात झाली होती.धो धो पावसात मराठा बांधव जाग्यावरून हटले नाही. आणि अखेर अजित पवारांचे वाहन अडवून निवेदन दिले आहे.