प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारातर कळंबकराची तहान भागवणारा मांजरा प्रकल्पात ही पाण्याची मोठी आवक
कळंब(प्रतिनिधी):- मांजरा नदीच्या उगम क्षेत्रात 18 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस झाल्याने मांजरा नदीला महापूर आला आहे.यामुळे नदीकाठच्या शेतात पाणी गेल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.खबरदारी म्हणून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.मात्र या आलेल्या महापुरामुळे कळंब कराची तहान भागवनारा मांजरा प्रकल्पात पाण्याची आवक झाली आहे.
अधिक माहिती अशी की, मांजरा नदी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातून उगम पावते या भागात 18 ऑगस्ट रोजी दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली ती रात्रभर कमीजास्त प्रमाणात असल्याने व या नदीवरील असलेले दोन्ही प्रकल्प आधीच भरलेले असल्याने मांजरा नदीला महापूर आला.यावेळी पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरे येथील पुला वरून पाणी वाहिल्याने येथील वाहतूक खंडित झाली होती.
येथील प्रशासनाने याची दखल घेत बीड तहसीलदार यांना ही माहिती दिली होती, बीड जिल्ह्यातील वाढवणा येथील संगमेश्वर प्रकल्पाला नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी करून सतर्कतेचा इशारा दिला होता. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील जनकापूर गावातील बंधाऱ्यावरून पाणी वाहिल्याने येथील ही संपर्क तुटला आहे.तर पारगाव येथील मांजरा काठच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने शेतीचे व पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
मात्र कळंब करासाठी वरदान ठरलेला मांजरा प्रकल्पात या महापुरामुळे पाण्याची आवक झाली आहे.
नशीब इकडे पाऊस नाही,नाही तर मोठा अनर्थ झाला असता
सदरील पाऊस हा फक्त उगम क्षेत्रां पुरता झाला आहे तर एवढा पाऊस.उगम क्षेत्रा सोबतच हा पाऊस सर्व दूर असता तर परस्थिती खुप भयावह झाली असती.